Lpg rates व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल केला आहे. 1 सप्टेंबरपासून मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 39 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
घरगुती सिलेंडरचे नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
इंडियन आईलच्या वेबसाइटनुसार, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ 1 सप्टेंबरपासून लागू झाली आहे. तर मुंबईत त्याची किंमत 1644 रुपये झाली आहे. यापूर्वी हा सिलिंडर मुंबईत 1605 रुपयांना मिळत होता. (LPG Price Hike
घरगुती सिलेंडरचे नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
याआधी ऑगस्टमध्ये एलपीजी गॅसच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. त्यावेळी कंपन्यांनी 8.50 रुपयांनी वाढ केली होती, मात्र यावेळी त्यांनी थेट 39 रुपयांनी वाढ केली आहे. याआधी जुलैमध्ये कंपन्यांनी 19 किलो गॅस सिलिंडरची किंमत 30 रुपयांनी कमी केली होती.
घरगुती सिलेंडरचे नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कोलकात्यात या सिलिंडरची किंमत 1664.50 रुपयांवरून 1802.50 रुपये झाली आहे. तर चेन्नईमध्ये हे सिलिंडर आता 1855 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी चेन्नईमध्ये 19 किलोचा सिलेंडर 1817 रुपयांना विकला जात होता.