Kisan Karj Mafi List 2024 राज्य सरकारच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती अभियानांतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन अनुदानासाठी आधार प्रमाणीकरणाला १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात अद्यापही १६ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण शिल्लक असल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी सांगितले.
50 हजार अनुदान लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नियमित पीककर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. मात्र काही शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने त्यांना अनुदान मिळाले नव्हते. अशा शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे.
अद्यापही १६ हजार ३४५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने आता १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी यासाठी १२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली होती. राज्यात या काळात ३३ हजार १६६ शेतकऱ्यांपैकी केवळ १६ हजार ८२१ शेतकऱ्यांनीच आधार प्रमाणीकरण झाले आहे.
50 हजार अनुदान लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकऱ्यांना ७ सप्टेंबरपर्यंत होती मुभा
शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले. यासाठी आधार संलग्न बँक खाते बंधनकारक करण्यात आले होते. मात्र राज्यातील अनेक शेतकऱ्यांकडे आधार संलग्न सरकारने १२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या काळात आधार प्रमाणीकरण करण्याची मुभा दिली होती. बँक खाते नसल्याने प्रोत्साहनपर लाभ देता येत नव्हता.
50 हजार अनुदान लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आधार प्रमाणीकरण न केलेले जिल्हानिहाय शेतकरी
पुणे ६५१, ठाणे ६४, हिंगोली १२७, पालघर १४०, लातूर ९९३, धाराशिव १९५८, रायगड १७४, बीड २२६, रत्नागिरी ६३७, नांदेड ८७२, सिंधुदुर्ग २२४, अमरावती २३४, नाशिक ४८४, अकोला ११९, धुळे २२९, वाशीम १६१, नंदुरबार १४५, बुलडाणा १००, जळगाव १०५३, यवतमाळ १३०३, नगर ७०६, नागपूर ४८३, सोलापूर २६०, वर्धा २०९, कोल्हापूर १४२७, चंद्रपूर ३२४, सांगली ४४६, भंडारा ६८१, सातारा ५३७, गडचिरोली १७५, संभाजीनगर ३९४, गोंदिया २४७, जालना ४३०, एकूण १६,३४५.