Bandhkam Kamgar Registration : इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नविन बांधकाम जेथे सुरु होते तेथे स्थलांतरीत व्हावे लागते. अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास, पाल्यांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवुन घ्यावे लागते.
बांधकाम कामगार नोंदणीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांनी दिनांक २७.१०.२०२० रोजीच्या बैठकीत राज्यातील मंडळाच्या १० लक्ष नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरण करण्याबाबतचा ठराव पारित करण्यात आला.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार (ज्याची नोंदणी सक्रिय आहे) या योजनेचा लाभार्थी राहील.
बांधकाम कामगार नोंदणीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी (ज्याची नोंदणी सक्रिय आहे) यांनी विहीत नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त (जिल्हा कार्यकारी अधिकारी, मइवइबाकमं) / सरकारी कामगार अधिकारी (उपजिल्हा कार्यकारी अधिकारी, मइवइबाकमं) यांचेकडे भरून दिल्यानंतर गृहपयोगी वस्तू संच पुरविण्यात येतील.
गृहपयोगी सांचातील वस्तू | नग |
ताट | 04 |
वाटया | 08 |
पाण्याचे ग्लास | 04 |
पातेले झाकणासह | 01 |
पातेले झाकणासह | 01 |
पातेले झाकणासह | 01 |
मोठा चमचा (भात वाटपाकरीता) | 01 |
मोठा चमचा (वरण वाटपाकरीता) | 01 |
पाण्याचा जग (2 लीटर ) | 01 |
मसाला डब्बा (07 भाग) | 01 |
डब्बा झाकणासह (14 इांच) | 01 |
डब्बा झाकणासह (16 इांच) | 01 |
डब्बा झाकणासह (18 इांच) | 01 |
परात | 01 |
प्रेशर कु कर -05 वलटर (स्टेनलेस स्टील) | 01 |
कढई (स्टील) | 01 |
स्टीलची टाकी (मोठी) झाकणासह व वगराळासह | 01 |