“नाच रे मोरा आंब्याच्या वनात” बुलाढाण्याच्या जिल्हा परिषद शाळेत सरांचा जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच

teacher viral dance शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना अभ्यासाचे दडपण जाणवते. शाळेची वेळ, गृहपाठ, शिकवणी यात विद्यार्थ्यांचे बालपण हरवत चालले आहे. मात्र काही शाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग करणारे शिक्षक आहेत. जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळांचे शिक्षकही वेगळा मार्ग निवडून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण आणि शाळेची आवड जागृत करत आहेत. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कधी तालसुरामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना कविता शिकवताना दिसतात तर कधी शिक्षक मुलांसोबत नाचताना दिसतात. आताही असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी शाळेच्या मैदानात नाचताना दिसत आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, व्वा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शाळेच्या मैदानावर मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित आहेत. यावेळी सर्व शिक्षक समोरच्या स्टेजवर उभे असून “नाच रे मोरा आंब्याच्या वनात” या गाण्यावर डान्स करत आहे. शिक्षकांबरोबरच विद्यार्थीदोखील उत्साहाने डान्स करताना दिसत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांच्याही डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Leave a Comment